Friday, 22 October 2021

आता कुठे उमगू लागलं.....

माय-बापाला ना कधी समजून घेतलं...
सतत काळजी करणं त्यांचं,
न मला कधी आवडलं...
वाटली मला ही बंधने त्यांची,
म्हणून प्रेम त्यांचं मी झिडकारलं...
वारंवार समजून सांगण्याच्या,
सवयीला त्यांच्या मी नाकारलं...
प्रेमाला त्यांच्या ना कधी मी
जाणून घेतलं...
धुंदीत स्वतःच्या जगण्यालाच
मी सर्वस्व मानलं...
पण कालांतरानं चित्रं सारं पालटलं...
होता लग्न झाले मग आई
हळुहळू उमगू लागले सारे काही...
आगमनाने बाळाच्या,
हृदयात प्रेम ते साठलं...
स्वतः होऊन आई,
हृदय मायबापाचं मला कळलं...
अन् आठवणीनं त्यांच्या,
हृदय हे पिळवटलं...
त्यांच्यावरचं माझं प्रेम,
सांगायचंच राहून गेलं...

सौ. राजश्री सुहास जाधव.


10 comments:

  1. खूपच सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर रचना👌👌

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर अप्रतिम भावस्पर्श कविता

    ReplyDelete
  4. खूप छान 👌🏻👌🏻👌🏻 अप्रतिम

    ReplyDelete
  5. वाहहह... खुप सुंदर ह्रदयस्पर्शी रचना... अप्रतीम शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  6. भावस्पर्शी रचना केली 👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...