मतभेद हे सर्वच नात्यांमध्ये असतात. माय लेकरांमध्ये,
मित्र-मैत्रिणींमध्ये, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये, कुटुंबामध्ये,
नवीन पिढी व जुन्या पिढीमध्ये मतभेद हे प्रकर्षाने जाणवतात. ऑफिस मधील सहकाऱ्यांमध्ये, समाजात, धर्मामध्ये अगदी देश-विदेशांमध्ये मतभेद दिसून येतात.
मतभेदांमुळे वाद-विवाद, कलह, नुकसान, मनस्ताप हेच पदरी पडते. मतभेद हे माणसातच दिसून येतात. आपण कधी पशु पक्ष्यांमध्ये मतभेद झालेले ऐकले आहे का ? नाही ते तर माणसांमध्ये दिसून येतात. माणसातील अहंभाव मतभेदास कारणीभूत ठरतो. तोच अहंभाव जर दूर सारला तर मतभेद मिटू शकतात. समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर माणसाने केलाच पाहिजे. मतभेदामुळे माणूस दुःखाच्या गर्तेत अडकतो. स्वतःबरोबरच
तो समाजाचे, देशाचे ही नुकसान करतो. मानव या मतभेदास कवटाळून ठेवतो आणि स्वतःचे जीवन दुःखी करतो.
मतभेद जर असले तर ते दूर केले पाहिजे, थोडा समजुतदारपणा दाखवला पाहिजे. मनाचा मोठेपणा दाखवून समोरील व्यक्तीस माफ करता आले पाहिजे. आपापसातील वाद-विवाद मिटवून सलोख्याने, एकजुटीने राहिले पाहिजे.
सौ.राजश्री सुहास जाधव.