Thursday, 7 October 2021

आठवणीतील गाव




माझ्या आठवणीतील गाव दोंदे त्याचे नाव
घेते मनाचा ठाव, व्याकुळ होतो जीव
अन् घेते गावाकडे धाव

स्वच्छ, सुंदर छोटेसे माझे गाव
पवित्र भीमेच्या सहवासाने
जपले स्वतःचे नाव

गावात प्रवेशास आहे सुंदर असे द्वार
भासे जणू ते गावाचे शिलेदार

गावात असती मंदिरे खूप
वाटते मजला तयांचे अप्रूप

जातीपातीच्या नाहीत येथे भिंती
जपली जातात येथे आपुलकीने नातीगोती

विकासाची कास धरण्यास
मुलेबाळे परगावी जाती
तरी प्रामुख्याने व्यवसाय यांचा असे शेती

रामनवमीचा दिवस असतो खास
असतो त्यादिनी गावचा उरूस

उत्सवास मुले बाळे, बाया- बापडे सारे जमती
आनंदे नाचती गाती अन् दंग होऊनी जाती

श्रीरामास अर्पण केला जातो पुरणपोळीचा प्रसाद
पै पाहुणे येऊनी घेती तयाचा आस्वाद

जपले जातात बंध येथे रूढी अन् रिती-रिवाजांचे
अजूनही नववधूस केले जाते केळवण दूध-शेवयांचे

आठवण होता गावाची घेते मी तेथे धाव
माझ्या आठवणीतील गाव दोंदे त्याचे नाव
अन् घेते मनाचा ठाव

सौ. राजश्री सुहास जाधव.


9 comments:

  1. अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟👌👌👌

    ReplyDelete
  2. मॅडम,आठवणीतील गाव...संजीवक वर्णन केलंय!✍️������

    ReplyDelete
  3. गावची वेस व गावच वर्णन अगदी आमच्या " लोणीमावळा " गावाशी मिळतजुळतं ,तुमची रचना वाचुन आमच्या गावाची आठवण झाली...!!
    अप्रतीम लिहीलय...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. खुप सुंदर गाव👌

    ReplyDelete
  5. आपले गावाविषयी चे प्रेम सुंदर रचनेत प्रकट झाले

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...