Monday, 11 October 2021

स्वप्नपूर्ती



धुके अज्ञानाचे विरुनी जावे
स्वप्न पहाटेचे सत्यात उतरावे
ज्ञानदीप ते दशदिशा उजळावे
गर्तेत अज्ञानाच्या न कोणी उरावे
शिकूनी, सवरुनी ज्ञान ते अवगत व्हावे
ध्येयांनाही मग पंख फुटावे
बळ ते सारे पंखात साठवावे
कवेत घेऊनी ध्येयांसी
स्वप्नपूर्तीकरिता सज्ज व्हावे
स्वकर्तृत्वावर स्वतः च्या ,
स्वप्न ते साकार करावे .......

सौ. राजश्री सुहास जाधव.


7 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...