Thursday, 21 October 2021

पंढरीनाथा




दाटला अंधार
ना कोणाचा आधार
झालो मी बेजार
कृपा कर पंढरीनाथा ||
होऊनी वारकरी
आलो मी मंदिरी
पाहू नकोस अंत आता
दर्शन दे रे पंढरीनाथा || धृ ||
रूप तुझे पाहण्या
आसुसले डोळे आता
तू सकलांचा त्राता
निज रूप तुझे दाव आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||१||
दर्शनाने तुझ्या
मिटतील साऱ्या चिंता
घेऊनी कर कटीवरी
उभा विटेवरी
ये सामोरी तू आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||२||
साद लेकराची ऐक आता
चरणी तुझ्या झुकवितो माथा
कर तुझ्या कृपेची बरसात आता
दर्शन दे रे पंढरीनाथा || ३||
निराकार तू ,
साऱ्यांचा आधार तू
रूप तुझे गोजिरे
मला दाव तू
झाले मन अधीर आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||४||

सौ. राजश्री सुहास जाधव.


11 comments:

  1. अप्रतिम भक्ति रचना 👌👌👌👌🌹🌹🌹🙏🙏

    ReplyDelete
  2. खुपच सुंदर भक्तिरचना 👌👌🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  3. खूपच छान सुंदर अप्रतिम रचना

    ReplyDelete
  4. अप्रतिम भक्तीरचना मॅडमजी ✍️������
    जय श्री हरी विठ्ठल!��������

    ReplyDelete
  5. खुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  6. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...