Friday, 29 October 2021

सुख



खरं सुख हे मानण्यात असतं
बसलो वाट बघत सुखाची जर
सहज ते हुलकावणी देत असतं 
दुःखाशिवाय सुख कळत नसतं
सुख अन् दुःख हे येत नि जातं
येणाऱ्या सुखाला अलवार
ओंजळीत घ्यायचं असतं अन्
सुखाच्या क्षणात स्वच्छंद जगायचं असतं
निसटून जाण्याआधी साऱ्यांना
ते वाटायचं असतं कारण,
देण्यात जे सुख असतं
ते कशातच नसतं.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


5 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...