Saturday, 16 October 2021

पुस्तक



निरक्षरास साक्षर करती पुस्तक
पुस्तकांपुढे व्हावे नतमस्तक
पुस्तक असती ज्ञानाचा अथांग सागर
अन् माहितीचे असती ते आगर
पुस्तके असती मानवाचा खरा मित्र
पुस्तकातुनी उमगते सकलांना
थोरा मोठ्यांचे चरित्र
पुस्तके देती प्रेरणा
अन् ध्येयाला नवी दिशा
पल्लवित करतात मनी आशा
ग्रंथ,पुराणे, संत साहित्य,
इतिहासाचा अमूल्य ठेवा
सहज प्राप्त होई मानवा
लेख, कथा, कविता,
कादंबऱ्यातुनी व्यक्त
होती भाव-भावना
ताण रहित करण्यास जीवना
पुस्तकेच येती कामा
वृध्दींगत होई शब्दसंपत्ती,
नवनविन संकल्पना,
पुस्तकातुनी लाभती जीवना
पुस्तकांशी करता मैत्री
मिळते सदोदित यशाची खात्री. 

सौ. राजश्री सुहास जाधव.


                       Google image


6 comments:

  1. खुप सुंदर सांगीतल पुस्तक व वाचनाच महत्व....👌👍🍫💐

    ReplyDelete
  2. खूप मस्त रचना अप्रतिम सांगितले

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली संदेश छान दिला

    ReplyDelete
  4. खरंय मॅडमजी, पुस्तक हा आपला मार्गदर्शक मित्रच; सुंदर लेखन!✍️👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम लिहिलंय पुस्तकाचे महत्व..अतिशय सुंदर लिखाण👌👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...