त्या पल्याड मला जायचं होतं
आणि स्वतःस आजमावून पाहायचं होतं
मनात साचलेल्या तमास समूळ उपटायचं होतं
अन् आनंदाच्या पलीकडील,
परमोच्च आनंदास प्राप्त करायचं होतं
नात्यांच्या पलीकडील,
नात्यांस अलवार जपायाचं होतं
क्षितिजा पलीकडील,
क्षितिजास नेत्रांनी या पाहायचं होतं
यशाच्या पलीकडील,
अत्युच्च शिखरावर पोहोचायचं होतं
पण मनात नियतीच्या काही वेगळंच होतं
पाशात तिच्या मला जखडलं होतं
त्या पल्याड जायचं स्वप्न,
ते स्वप्नच राहिलं होतं.......
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर रचना केली मॅडम!✍️������
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम...🌹🌺🌹🌹💗🌿🌿🙏
ReplyDeleteसुंदर रचना केली आहे सखी 👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर..
ReplyDelete