Thursday, 14 October 2021

प्रितीचा छंद



छंदात छंद प्रितीचा छंद जडुनी मन हे मोहरते
गुंतुनी तुझ्यात  वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
त्या स्वप्नात येऊनी मनमीत होऊनी
घे करुनी मला तुझीच रे साजणी
तुझीच रे साजणी
अलवार  या मनावरी नाव तुझे कोरतना
वाटे मनासी मजला जणू मोरपीस ते फिरताना
ही प्रीत तुझी बेधुंद करी
न कधी मनासी ती आवरी
न कळे काय ते मनाला होते ?
गुंतुनी तुझ्यात वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
झुरते मी तुझ्यासाठी , नाव तुझेच रे ओठी
तुझ्या प्रीतिचे आळविते गीत मी
माझ्या ओठी
गुंतुनी तुझ्यात वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
त्या स्वप्नात येऊनी मनमीत होऊनी
घे करुनी मला तुझीच रे साजणी
तुझीच रे साजणी.....

राजश्री  सुहास जाधव.


6 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...