बोनस :
आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही.
त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत चाललेली जीवनशैली. लोकांचा अंग मेहनत न करता सहज साध्य होईल असे काम करण्याकडे जास्त कल असतो. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर स्मार्ट वर्किंग ज्याला जमले तो या स्पर्धेत तग धरू शकेल,हा मोठा समज. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे मानवी आयुष्यमान हे कमी होत चालले आहे. ऐन तारुण्यात असताना होणाऱ्या शारीरिक व्याधी, हार्ट अटॅक, मधुमेह यांसारखे आजार बळावले आहेत. परिणामी आयुष्याचा प्रवास हा फार लवकर संपताना दिसून येत आहे. जर एखाद्याने पन्नाशी गाठली आणि त्यात तो सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगत असेल तर तो त्या माणसाच्या आयुष्यातील खरा बोनस आहे असेच म्हणता येईल.
पूर्वीचे लोक कष्ट, अंगमेहनत करत होते, शेतात राबत असल्याने त्यांचे शरीर दणकट होते. त्यामुळे इतर व्यायाम करण्याची त्यांना कधी गरजही लागत नसे. सकस, पौष्टिक असा चौरस आहार त्यांना मिळत असे. त्यामुळे त्यांचे आयुर्मानही भरपूर होते.
आता योगाचे क्लासेस, जिम लावले जातात शरीर
सुदृढ ठेवण्यासाठी. ते ही होईल की नाही याची खात्री माणूस देऊ शकत नाही. म्हणून आयुष्य सुदुढ ठेवायचे असेल तर भरपूर मेहनत करा, शरीर सारखे हलते ठेवा, सकस चौरस आहार आपल्या खाण्यात असू द्या,मन कायम सकारात्मक आणि प्रसन्न विचारांनी भरलेले असेल हे कायम लक्षात असू द्या, भरपूर पाणी प्या, रोज आवश्यक तेवढे नक्की चाला, व्यसनांपासून दूर राहा, मग आपोआपच आपले आयुष्य वाढेल. माणूस सुखासमाधानाने जगू शकेल. हाच खरा आयुष्यातील बोनस असेल.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
सौ. राजश्री सुहास जाधव.
लेखातून जीवन जगण्याचा सुंदर मंत्रच दिला आपण...!✍️👌👌👌
ReplyDelete