दिवा म्हणे वातीला
देशील ना साथ मला
वात म्हणे कापसाला
सामावून घेशील ना तुझ्यात मला
कापूस म्हणे झाडाला
रुजवशील ना पुन्हा एकदा मला
झाड म्हणे माणसाला
सांभाळशील ना रे नीट मला
माणूस म्हणे ईश्वराला
हे ईश्वरा, सुखी ठेवशील ना रे मला
ईश्वर म्हणे माणसाला
हे मानवा, स्त्रीची पिळवणूक,हिंसाचार
भ्रष्टाचार, अराजकता सारे थांबवून
पेलशील जर या जबाबदारीला
तरच सुखी ठेवीन तुला.
सौ. राजश्री सुहास जाधव.
वा वा वा खूप खूप खूप सुंदर आणि अगदी अप्रतिम रचना केलीत राजश्रीताई 👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदरच रचना
ReplyDeleteखूप खूप मस्त
ReplyDeleteअप्रतिम च👌👌👌👌👌🙏🙏💐🍫
ReplyDeleteअप्रतिम शब्दसौदर्य...जणू जीवनरहस्यच उलगडलंय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteअप्रतिमच...खूपच सुंदर रचना👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर...
ReplyDelete