जे असे गूढ
लागे त्याचीच ओढ
ओढ ती आसमंतीच्या चंद्र,चांदण्यांची
ओढ ती सप्तरंगी इंद्रधनुची
ओढ ती झर झर वाहणाऱ्या
शुभ्र-धवल निर्झराची
ओढ ती दाटुनी आलेल्या
काळयाभोर मेघातुनी बरसणाऱ्या जलधारांची
ओढ ती दूरवरी आळवणाऱ्या
कोकिळेच्या मंजुळ स्वरांची
ओढ ती हलकेच कवाडांतुनी
प्रवेशणाऱ्या त्या रवि किरणांची
ओढ ती कान्ह्याच्या बासरीतुनी
उमटणाऱ्या सुरेल स्वरांची
अनामिक ती ओढ
लाविती जीवाला वेड
उठते मनी काहूर
आविष्कार तो देखण्या
होई जीव आतुर
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप मस्त रचना अप्रतिम सुंदर.🌹🌹🌺🌺👌👌👌🌿🌿🌿💗
ReplyDeleteसुंदर रचना!👌👌👌शुभ सकाळ 🙏
ReplyDeleteकवितेची ओढ खूपच सुंदर👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌🏻👌🏻👌🏻 अप्रतिम
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम
ReplyDeleteखुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखुप सुंदर रचना ताई
ReplyDelete