Friday, 29 October 2021

शब्दाविना



भाव मनातले जाणण्या
का कराव्या शब्दांना विणविण्या ?
गुज मनीचे ह्या हृदयीचे,
त्या हृदयासी उमजण्या
असावी निस्वार्थ भावना
व्यक्त होईल ती शब्दांविना
डोळ्यांतूनही उमगेल भाव सारे
कशाला हवे मग शब्दांचे पसारे !
शब्दाविना घडेल सारे 
भाव मनातले घेऊन
येईल सुखाचे वारे .....

सौ. राजश्री सुहास जाधव.



























6 comments:

  1. खूप खूप मस्त रचना..सुंदर..🌺🌺🌹🌹👌👌🌿🌿💗

    ReplyDelete
  2. अप्रतीम रचना,सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👍👍

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...