भाव मनातले जाणण्या
का कराव्या शब्दांना विणविण्या ?
गुज मनीचे ह्या हृदयीचे,
त्या हृदयासी उमजण्या
असावी निस्वार्थ भावना
व्यक्त होईल ती शब्दांविना
डोळ्यांतूनही उमगेल भाव सारे
कशाला हवे मग शब्दांचे पसारे !
शब्दाविना घडेल सारे
भाव मनातले घेऊन
येईल सुखाचे वारे .....
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप खूप मस्त रचना..सुंदर..🌺🌺🌹🌹👌👌🌿🌿💗
ReplyDeleteअप्रतिम सुंदर ताई
ReplyDeleteछान लिहिलंय मॅडम!✍️������
ReplyDeleteअप्रतीम रचना,सुरेख शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👍👍
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌
ReplyDelete