दूरवर, आसपास , जे जे दिसे आपणास
सारे आहे नश्वर खास
परी निरंतर लागे मनी तयाचीच आस
अन् वेदनेचे डंख टोचे नाहक या जीवास
गुंतूनी घेई मानव स्वतःसी या मृगजळात
घेई धाव मग राग, लोभ आणिक मायेच्या जंजाळात
जणू भ्रमर तो जाई गुंतुनी त्या सुमनात
मग गवसेल कसे अंतरीचे सुख जीवनात?
लाभण्या अंतरीचे सुख, व्हावे अंतर्मुख
करावे नामस्मरण होऊनी ईश्वर सन्मुख .....
सौ. राजश्री सुहास जाधव.
अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना mam
ReplyDeleteअप्रतिम शब्दसौदर्य मॅडम!������
ReplyDelete👌👌👃
ReplyDelete