Saturday, 23 October 2021

प्रेरणा



यजमानांच्या प्रेरणेने घेतली हाती लेखणी 
अन् सहज जाहले लिहिती मी
विचार ते प्रकटले कागदावरी
घडली कशी काय ही जादुगरी
माझे मलाच न उमजे आजवरी
लेखणीत असे ताकद अफाट खरी
जणू आहे ही शब्दांची तिजोरी
रीती करते ती लेखणीतुनी पानावरी
चुकत असतील शब्द जरी
शिकण्याची असे सदैव तयारी
दुनिया ही शब्दांची न्यारी
आहे त्या दुनियेत मी रमणारी ....

सौ. राजश्री सुहास जाधव.





8 comments:

  1. खूप सुंदर तुझी लेखणी ...मला आवडते भारी 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप मस्त रचना अप्रतिम..🌺🌺🌹🌹👌👌👌💗

    ReplyDelete
  3. प्रेरणादायक व्यक्तीमत्वाला मानाचा मुजरा मॅडम!🙏
    सुंदर शब्दाविष्कार!👌👌👌

    ReplyDelete
  4. खुप छान लिहीलयस 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. व्वा..अतिशय सुंदर लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete
  6. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  7. व्वा खूप छान लिहिलंय अप्रतिम

    ReplyDelete
  8. वाहह..खुप सुंदर व्यक्त केले आहेत मनातले भाव... छान लीहीलय...👌👍💐🍫

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...