Wednesday, 20 October 2021

भाव



नाना तऱ्हेचे असती भाव
जे घेते मनाचा ठाव
कल्लोळ उडता भावनांचा
चढवुनी साज शब्दांचा
सुटेल गुंता मनाचा
प्रेमभाव समजण्या
आधार तो प्रेमळ शब्दांचा
करुण भाव उमजण्या
अलवार शब्दांच्या त्या मांडण्या
द्वेष भाव तो असे भयंकर
शब्दा-शब्दातुनी  बरसे मत्सर 
जाणुनी घेता भाव भावना
ना भासेल मग कसलीच विवंचना 

सौ. राजश्री सुहास जाधव.


8 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...