उठ रे बंदा
अन् तोच धंदा
चालू असे सदा
कामे ती पाचवीला पुजली
स्त्रियांच्या सदासर्वदा
घरदार, नोकरी-चाकरी,
मुल-बाळ, त्यांचा सांभाळ,
दळण-कांडण, कामे ती हजार
तारेवरची कसरतच असते फार
केरवारा, सगा-सोयरा करता करता
होतो जीव घाबरा-घुबरा
येतो मग साऱ्याचा तिटकारा
अन् शोधू लागतो सुखाचा किनारा
' बास झालं...थांबावं आता,
जग तू स्वतःकरिता '
मिळे तो मनाला इशारा
मग होते सज्ज अन्
जगते स्वच्छंद,
हर एक क्षण सारा.....
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम रचना ताई
ReplyDeleteखूच छान रचना...👌👍✍️🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना केलीत....
ReplyDeleteमस्त लिहिलंय मॅडम!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete100%✔️
ReplyDelete