छंदात छंद प्रितीचा छंद जडुनी मन हे मोहरते
गुंतुनी तुझ्यात वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
त्या स्वप्नात येऊनी मनमीत होऊनी
घे करुनी मला तुझीच रे साजणी
तुझीच रे साजणी
अलवार या मनावरी नाव तुझे कोरतना
वाटे मनासी मजला जणू मोरपीस ते फिरताना
ही प्रीत तुझी बेधुंद करी
न कधी मनासी ती आवरी
न कळे काय ते मनाला होते ?
गुंतुनी तुझ्यात वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
झुरते मी तुझ्यासाठी , नाव तुझेच रे ओठी
तुझ्या प्रीतिचे आळविते गीत मी
माझ्या ओठी
गुंतुनी तुझ्यात वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
त्या स्वप्नात येऊनी मनमीत होऊनी
घे करुनी मला तुझीच रे साजणी
तुझीच रे साजणी.....
राजश्री सुहास जाधव.
वाह खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteजबरदस्त 😍😍
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!✍️������
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना केली mam.🌹🌹🌺🌺🌺🌿🌿👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌
ReplyDeleteअप्रतिम च...
ReplyDelete