Friday, 15 October 2021

त्या पल्याड

 



त्या पल्याड मला जायचं होतं
आणि स्वतःस आजमावून पाहायचं होतं
मनात  साचलेल्या तमास समूळ उपटायचं होतं
अन् आनंदाच्या पलीकडील,
परमोच्च आनंदास प्राप्त करायचं होतं
नात्यांच्या पलीकडील,
नात्यांस अलवार जपायाचं होतं
क्षितिजा पलीकडील,
क्षितिजास नेत्रांनी या पाहायचं होतं
यशाच्या पलीकडील,
अत्युच्च शिखरावर पोहोचायचं होतं
पण मनात नियतीच्या काही वेगळंच होतं
पाशात तिच्या मला जखडलं होतं
त्या पल्याड जायचं स्वप्न,
ते स्वप्नच राहिलं होतं.......

सौ. राजश्री सुहास जाधव.


4 comments:

  1. खूप खूप मस्त रचना अप्रतिम...🌹🌺🌹🌹💗🌿🌿🙏

    ReplyDelete
  2. सुंदर रचना केली आहे सखी 👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...