दाटला अंधार
ना कोणाचा आधार
झालो मी बेजार
कृपा कर पंढरीनाथा ||
होऊनी वारकरी
आलो मी मंदिरी
पाहू नकोस अंत आता
दर्शन दे रे पंढरीनाथा || धृ ||
रूप तुझे पाहण्या
आसुसले डोळे आता
तू सकलांचा त्राता
निज रूप तुझे दाव आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||१||
दर्शनाने तुझ्या
मिटतील साऱ्या चिंता
घेऊनी कर कटीवरी
उभा विटेवरी
ये सामोरी तू आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||२||
साद लेकराची ऐक आता
चरणी तुझ्या झुकवितो माथा
कर तुझ्या कृपेची बरसात आता
दर्शन दे रे पंढरीनाथा || ३||
निराकार तू ,
साऱ्यांचा आधार तू
रूप तुझे गोजिरे
मला दाव तू
झाले मन अधीर आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||४||
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम भक्ति रचना 👌👌👌👌🌹🌹🌹🙏🙏
ReplyDeleteखुपच सुंदर भक्तिरचना 👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteKhuoach chan
ReplyDeleteखूपच छान सुंदर अप्रतिम रचना
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteअप्रतिम भक्तीरचना मॅडमजी ✍️������
ReplyDeleteजय श्री हरी विठ्ठल!��������
खूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतिमच 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम भक्तीरचना
ReplyDeleteखुप सुंदर भक्तीमय रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete