माय-बापाला ना कधी समजून घेतलं...
सतत काळजी करणं त्यांचं,
न मला कधी आवडलं...
वाटली मला ही बंधने त्यांची,
म्हणून प्रेम त्यांचं मी झिडकारलं...
वारंवार समजून सांगण्याच्या,
सवयीला त्यांच्या मी नाकारलं...
प्रेमाला त्यांच्या ना कधी मी
जाणून घेतलं...
धुंदीत स्वतःच्या जगण्यालाच
मी सर्वस्व मानलं...
पण कालांतरानं चित्रं सारं पालटलं...
होता लग्न झाले मग आई
हळुहळू उमगू लागले सारे काही...
आगमनाने बाळाच्या,
हृदयात प्रेम ते साठलं...
स्वतः होऊन आई,
हृदय मायबापाचं मला कळलं...
अन् आठवणीनं त्यांच्या,
हृदय हे पिळवटलं...
त्यांच्यावरचं माझं प्रेम,
सांगायचंच राहून गेलं...
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूपच सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम भावस्पर्श कविता
ReplyDeleteApratim
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻👌🏻 अप्रतिम
ReplyDeleteसुंदर रचना केली मॅडम!✍️������
ReplyDeleteवाहहह... खुप सुंदर ह्रदयस्पर्शी रचना... अप्रतीम शब्दांकन...👌👍💐🍫
ReplyDeleteभावस्पर्शी रचना केली 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌
ReplyDeleteखुप सुंदर रचना
ReplyDelete