Friday, 8 October 2021

शक्ती स्वरूपिणी



भक्ती तुझिया ठायी
वाहिन मी
निज रूप तुझे दावुनी
घे आम्हासी तारूनी
वंदन आमुचे तुझिया चरणी
तू दुर्गा, तू गौरी, तू जगदंबा
तू चंडी अन् तूच चामुंडा
आणिक तूच महिषासुर मर्दिनी
विनाश करण्या दुर्जनांचा
होई तू सौदामिनी
झालीस तू सावित्री
नारीसी दान विद्येचे देऊनी 
नवरात्रीचे नवरंग लेऊनी
गेल्या दशदिशा त्या उजळुनी
व्रत, वैकल्ये करुनी
लाभेल सौख्य जीवनी
जाईल धन-धान्याने कोठार ते भरुनी.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


10 comments:

  1. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. कवितेतून विचारांची प्रगल्भता दिसते 👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम रचना 👌👌👌👌🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  4. सुंदर रचना केली मॅडम!������जय ब्रम्हचारिणी माता!��������

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर रचना👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना केली सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...