Friday, 1 October 2021

भाव ते न्यारे....



भाव ते खुलूनी दिसे न्यारे
लोभस मुखचंद्रमा
भुलवी मनासी रे
भाव ते हसरे
करी हर्षाची पखरण रे
भाव ते लडिवाळ
होई प्रीत ती मधाळ
भाव ते अवखळ
जणू झरणारा निर्झर
घालीसी मनासी भुरळ
भाव ते रुसरे
जणू काटे गुलाबाचे बोचरे
भाव ते आक्रंदलेले देखता
होई जीवाची घालमेल रे
भाव हे तुझे
सप्तरंगी इंद्रधनुसम प्रकटती
क्षणात अवतरती अन्
क्षणात लोपती
बदलती ते रंग किती !
परी तुझीच आस असे चित्ती 
रूप तुझे साजिरे मनासी मोहविती 

सौ. राजश्री सुहास जाधव.


8 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...