मायेची माणसं एकामागून एक गेली मज सोडूनी
पारखी झाले मी त्यांच्या प्रेमातुनी
लाड माझे पुरविण्या न उरले आता कुणी
साद माझी जाईल का त्यांच्या कानी ?
तीच माता, तीच भगिनी
अन् तोच भ्राता लाभेल का मजला ?
अर्जव करते रे भगवंता तुजला
गेले सोडूनी जरी ते मला
कप्पा आठवणींचा हृदयात
खोल तो साठवला
येताच आठवणी त्यांच्या
कप्पा तो मी उलगडला
आठवणी त्या देती पाठबळ
माझ्या जगण्याला....
सौ. राजश्री सुहास जाधव.
हृदयस्पर्शी काव्यरचना केली सखी ✍️🌟👌
ReplyDeleteधन्यवाद सखी 🙏
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌
ReplyDeleteखूप सुरेख अप्रतिम☺️🙏
ReplyDeleteखूपखूप सुरेख रचना..छान लिहलंय
ReplyDeleteखुप छान , हृदयस्पर्शी ,
ReplyDeleteहि कविता वाचून एक असच सुंदर गाणं आठवल
जिंदगी के सफर मे गुजर जाते हे जो मकाम वो फिर नही आते, वो फिर नाहि आते......