Thursday, 23 September 2021

इंद्रधनुष्य



रिमझिम रिमझिम बरसूनी जाता धारा
नभी प्रकटला मनमोहक इंद्रधनुष्यी पिसारा
देखोनी सप्तरंगांचे  रूप साजिरे
हरखूनी गेले हे मन बावरे ||
साठवूनी ठेवण्या रूप तयाचे, नेत्र हे आसुसले
पण निमिषार्धात इंद्रधनू ते लोपले
भाव-भावनांची जणू बनून प्रतीके
सप्तरंग हे अवतरले
अन् जीवन अवघे रंगात रंगले ||
तांबडा रंग हा प्रेमाचा अन् रागाचा
नारिंगी हा त्यागाचा अन् ऊर्जेचा
पिवळा रंग हा मैत्रीचा अन् आशावादाचा
हिरवा रंग हा समृद्धीचा अन् प्रगतीचा
निळा हा विश्वासाचा अन् सद्गुणतेचा
पांढरा रंग हा पावित्र्याचा अन् शांतीचा
जांभळा तो गूढतेचा अन् कल्पकतेचा
पांघरुणी इंद्रधनूचे रंग हे सारे
हरखूनी गेले हे मन बावरे ||

सौ.राजश्री सुहास जाधव.


5 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...