Friday, 17 September 2021

स्मृती




रात्र सरली, सरली वर्ष, सरत चालले आयुष्य
तगमग होई जीवाची, धुंद झाली मती,
फिरुनी जाग्या झाल्या स्मृती,
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मी, झुलते मी |
स्मृतींना गंध आहे शाळेतील मातीशी एकरूप झालेल्या
इवल्याशा निलगिरीचा,
स्मृतींना गंध आहे बासरीतून उमटणाऱ्या
त्या मंजुळ सुरांचा,
स्मृतींना गंध आहे भाबड्या त्या मैत्रीचा,
स्मृतींना गंध आहे हसत खेळत शिक्षण देणाऱ्या
त्या गुरुजनांचा,
स्मृतींना गंध आहे 'सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार
या अभिवादना ' या प्रार्थनेचा,
रात्र सरली, सरली वर्ष , सरत चालले आयुष्य
तगमग होई जीवाची, धुंद झाली मती,
फिरूनी जाग्या झाल्या स्मृती,
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मी, झुलते मी ||

सौ. राजश्री सुहास जाधव.



7 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...