शब्दांविना सारे असे फोल
जाणून घ्या हो शब्दांचे मोल
शब्द असतात प्रेमळ, हसरे
अन् कधी लडिवाळ, रुसरे
कधी शब्द कडवट, बोचरे ,
कधी शब्द होती अंगार
कधी शब्द होती लाचार
शब्दांनी शब्द जोडती माणसाला
तसे शब्दांनी शब्द कारण असे तंट्याला
अलवार शब्द हे मनासी घालती फुंकर
अन् भेदती ह्रदयीचे अंतर
सूर-तालांचा साज चढवूनी
शब्दांतूनी होते गीत साकार
हृदयातील भाव जाणण्या शब्द हेच आधार
शब्दांविना सारे असे फोल
जाणिले मी हो शब्दांचे मोल 🌺🌺
सौ. राजश्री सुहास जाधव.

शब्दांची ही जादूच न्यारी , गुंफले त्या तुम्ही ते छान
ReplyDeleteइतकी सुंदर रचना करून वाचण्यास दिली आम्हास
त्यास तुमचे खूप खूप आभार । ☺️🙏
शब्दांची महत्ता सांगणारी एक उत्तम रचना 🤗 ✌️
धन्यवाद सर 🙏
Deleteअतिशय सुंदर... रचना केलीत...
ReplyDelete💐💐💐👌👌👌
खूप छान सुंदर अप्रतिम रचना mam...🌿🌿🌹🌹👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺
ReplyDeleteधन्यवाद सूरज🙏
Deleteखूप छान शब्दांनी महती अप्रतिम....👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteधन्यवाद सखी🙏
Deleteशब्दांच्या पलीकडले
ReplyDeleteसुंदर रचना शब्दबद्ध केली आहे
ReplyDelete