श्री छत्रपती शिवरायांची
शौर्य गाथा ज्ञात आहे सकळा
रंग तयांचा वेगळा ||विठ्ठल नाम जपता जपता तुकोबांनी
फुलवला भक्तीचा मळा
रंग तयांचा वेगळा ||
मातृत्वाच्या दानाचा
नारी अनुभवे सुखसोहळा
रंग तयांचा वेगळा ||
कन्हैयाच्या बासरीने
मंत्रमुग्ध झाल्या गोपिका या गोकुळा
रंग तयांचा वेगळा ||
स्वातंत्र्य प्राप्तीकरिता शूरवीरांनी
जोपासला छंद बलिदानाचा हा आगळा
रंग तयांचा वेगळा ||
क्षितिजा पलीकडले ज्ञात होण्या
मानव झेपावला अंतराळा
रंग तयांचा वेगळा ||
जन्म घेऊनी या भूमीवर
अनुभवते मी नित्य सोहळा
रंग माझा वेगळा || 🌷🌷
सौ.राजश्री सुहास जाधव.

अतिशय सुंदर व सुरेख....
ReplyDelete👌👌👌💐💐💐💐
प्रेम कवी...✍️