Thursday, 16 September 2021

प्राजक्त......


सप्तपदीच्या पावलांनी गृहप्रवेश मी केला 

लोभस प्राजक्ताच्या सुवासाने जीव हा मोहरला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


नवखी होते तिथे मी, हर एक क्षण नव्याने अनुभवला 

सासु-सासरे, दिर-नणंदांचा राखुनी मान आदर तयांचा

 केला, अन् माय बापाने दिलेला संस्कार मी जोपासला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


करुनी आपुले सकळांना, गुंफूनी ठेविले या नात्यांना 

जिव्हाळ्याचा अन् प्रेमाचा भावबंध मी जपला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


एकरूप होत सहचाऱ्यासव, संसार सुखाचा केला 

संसाराच्या वेलीवर चिमुकल्याच्या आगमनाने

जीव माझा सुखावला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


माहेरच्या आठवणींनी व्याकुळलेल्या मनाला,

नात्यांनी हळुवार दिलासा दिधला 

आपुलकीचा ठेवा हा हृदयी मी साठवला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


चांदण्यासम भासणाऱ्या, श्वेत, केशरी रंगात रंगलेल्या 

लोभसवाण्या प्राजक्ताने जणू त्याग आणिक 

पावित्र्याचा संदेश मजला दिधला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


सौ. राजश्री सुहास जाधव.

11 comments:

  1. अतिशय सुंदर व सुरेख...
    अभिनंदन...💐💐💐

    ReplyDelete
  2. खुप छान रचना 👌🏼👌🏼

    गणेश दळवी

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर कविता👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लेखन आहे. प्रत्येक स्त्रीच्या मनातील भावना थोड्याफार प्रमाणात अशाच असतात 👏👏👏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...