Saturday, 25 September 2021

स्वच्छंद



काय मिळवलं अन् काय गमवलं
नाही गणित मला हे मांडायचं
उणे , अधिकाच्या फंदात
नाही मला पडायचं
एकदा मिळालेलं आयुष्य
आहे मला आनंदाने उपभोगायचं
मग का उगाच जीवास जाळत बसायचं
अन् नाहक दुःखाला कवटाळायचं
त्यापरी बेभान होऊनी जगायचं
विहंगासम स्वच्छंद विहरायचं
अन् मन मानेल तसं जगायचं ......

सौ.राजश्री सुहास जाधव.


7 comments:

  1. खूपच सुंदर लिहिलंस राजश्री 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  2. खुप छान रचना 👌👌

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर लिहिलंय👌👌👌👌

    ReplyDelete
  4. मनासारखं सुंदर लिहिलंस👌👌

    ReplyDelete
  5. सुंदर लेखन केले ✍️👌👌👌

    ReplyDelete
  6. अप्रतिम...!!
    सुंदर रचना केली आहे..👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...