कोणासही दुखवणे, आवडत नाही मला
झाले असेल अनावधानाने,
तर कराल का माफ मला?
नाहीतर कायम अपराधी वाटते मनाला
अन् छळते ती भावना या माझ्या जीवाला
असते मी माझ्या लेखणीत रमलेली
नसते जगाची भ्रांत मला उरलेली
नात्यांपरी आवडे मज दुनिया ही न्यारी
अनोख्या भाव विश्वात मज घेऊनी जाणारी
नसे मग कसलीच तिथे दुनियादारी
अश्या विश्वात रमणारी मी,
सांगा मजला, काय हा गुन्हा केलाय मी !
आरोप प्रत्यारोपापेक्षा ह्या दुनियेतच
राहणे पसंद करते मी ......
सौ. राजश्री सुहास जाधव.

अतिशय सुंदर...
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌
ReplyDeleteMast
ReplyDelete