जगी सर्व सुखी असा कोण आहे||
विचारी मना तूच शोधूनी पाहे ||
समर्थ रामदास स्वामींनी किती समर्पक ओळी रचल्या आहेत ना ! आपणच आपल्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. जगात सर्वार्थाने सुखी मनुष्य खरेच कोणी असेल का ?
खरे सुख हे मानण्यात असते. आयुष्याच्या एका वळणावर आल्यानंतर आपल्याला कधी कधी वाटून जाते की, या जगात येऊन आपण काय कमावलं? 'नाव, पैसा, प्रसिध्दी, आणखी काय ! याचं उत्तर आपलं आपल्यालाच मिळून जाईल.
काय कमावलं अन् काय गमावलं हे मागे वळून बघण्यात काहीच उपयोग नसतो. कारण माणूस स्वतःच्या सुखासाठीच झटत असतो. जास्तीजास्त संपत्ती आपणास कशी प्राप्त होईल, स्वतःचं वर्चस्व कसं प्रस्थापित होईल यासाठी माणूस सतत धडपडत असतो. या सर्व खटाटोपात माणूस स्वच्छंद जगणं विसरून जातो, नाती, मैत्री, सहृदयता, माणुसकी या साऱ्यांना दुर्लक्षित करतो. स्वतःचा फायदा करून घेताना दुसऱ्यांची मने दुखावली तरी त्याला काही फरक पडत नाही.
बक्कळ पैसा कमवूनही माणूस समाधानी राहू शकत नाही. सुखाची झोप त्याला मिळत नाही कारण, त्याला आत्मिक समाधान प्राप्त झालेले नसते. सर्वांच्यांमध्ये राहूनही तो एकटा पडतो. हे माणसाने
स्वतःच्या कृत्यानेच निर्माण केलेले असते.
म्हणून काय कमावलं, हे न बघता, जे हातून निसटून गेलं आहे ते प्रेम, नात्यांतील जिव्हाळा, दात्तृत्व, परोपकार, ईश्वराप्रती भक्तिभाव माणसाने अंगिकारला
पाहिजे. तेव्हाच खरे सुख प्राप्त होईल.
सौ.राजश्री सुहास जाधव.

खरंय मॅडम, भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख मोठ्ठे.जे संत-सज्जनांनी मिळविले होते.सुदर लेख!👌👌👌
ReplyDeleteअगदी बरोबर सखी, वास्तव विचार मांडले या लेखातून ✍️👌👌👌
ReplyDelete