Wednesday, 29 September 2021

वडा पाव



आज जागतिक वडापाव दिन आहे. मला स्वतःला वडापाव अत्यंत प्रिय आहे. म्हणून ही रचना करण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व.🙏

दन खोलुनी
डाव तो साधावा
पावा संगे 
डा तो खावा
वडापाव विना
नाही लज्जत त्या खाण्याला
रंकापासुनी रावा पर्यंत
आवडे तो सर्वांना
वडापाव न आवडे
असा माणूस विरळा
खवय्यांसाठी असे
खाण्याचा तो नित्य सोहळा
अवघ्या विश्वात असे
याचा बोलबाला
खाऊनी वडापाव
तृप्तता लाभे उदराला
मज वाटे वडापाव म्हणजे
पुस्तक आणिक धडा
गणित आणिक पाढा
कात आणिक विडा
वडापाव जणू 
पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा
पाव म्हणजे पती, जो बनुनी ढाल
करितो साऱ्या परिवाराचे रक्षण
वडा म्हणजे पत्नी, तावून सुलाखून
करते सर्वांच्या इच्छांचे शमन
एकरूप होऊनी परस्परांसवे
सुखी होई जीवन
सोबतीने परस्परांच्या,
सागर किनारी बसुनी
गरमागरम वडापावचा
आस्वाद घ्यावा
मग शीड नसलेल्या नौकेसही
दोघांचा हेवा वाटावा.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


10 comments:

  1. खुप सुंदर 👌👌👌
    कधी बोलावता वडा-पाव खायला 😊

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌

    ReplyDelete
  3. मॅडमजी,क्या खूब लिखाण जी आपने .आपण वडापाव डे निमित्त लिहिलेली कविता लाजवाब!✍️������

    ReplyDelete
  4. व्वा खूपच भारी वडापाव सर्वांना आवडेल तुमचे लेखन वाचून तर न खानाराही म्हणेल खावू या👌👌

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर व भारी वडापाव

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...