Monday, 27 September 2021

शब्द गंध



शब्दांना असती गंध 🌹🌹
जे लाविती प्रीतिचे छंद
शब्दातुनी झळके गंध ते अपरिमित
शब्द भासती ते परिचित वा अपरिचित
शब्दांनी शब्द जोडता प्राप्त होई वाक्यास त्या अर्थ
अंतरीचे भेद जाणण्या शब्दांत असती सामर्थ्य
मृदू शब्दांना असे मायेचा गंध
परखड शब्दांतुनी व्यक्त होई उग्र तो दर्प
प्रेमळ, लडिवाळ शब्दांनी
भरली जाई कुपी अत्तराची
शब्दांना धार असती शस्त्राची
शब्द हसवती, शब्द रडवती,
शब्द घडवती अन् शब्द बिघडवती
काळजास थेट भिडती शब्द
असे शब्दांची सारी किमया
जणू वाटे मज अत्तराचा फाया 🌺🌺🌺

सौ. राजश्री सुहास जाधव.


9 comments:

  1. अतिशय सुंदर शब्दसौंदर्य 👌👌

    ReplyDelete
  2. राजश्री ताई तुम्ही खुप सुंदर कविता लिहली,खुप मस्त रचना झाली💥👌👌👌👌🍁🌱

    ReplyDelete
  3. खुप सुंदर 👌👌कवितेतल्या शब्दांबद्दल काय बोलावे...सुंदरच 👌👌💐💐

    ReplyDelete
  4. अप्रतिम ..!
    खूपच छान सुंदर रचना अत्तराचा फाया👍
    🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
    🙏

    ReplyDelete
  5. मॅडम,शब्दाना सुंदर पैलू पाडले की!👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर शब्द रचना केलीत...

    ReplyDelete
  7. खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...