Monday, 20 September 2021

सृष्टीची जपणूक



आधुनिकतेच्या नावाखाली
अवडंबर माजवले मानवाने
हिरव्या कांतीने नटलेल्या वसुंधरेला 
वृक्षतोड करूनी नेस्तनाभूत केले त्याने
सिमेंटची उभारूनी जंगले वेगाने
दुष्काळाला जणू आमंत्रणच दिले मानवाने
शेतात राबणाऱ्या हातांनी वाट शहराची धरली
अन् स्वतःच्या शिवाराला विकण्याची
वेळ माणसावर ती आली
करू लागले दुकानदारही आता
धान्यात बेमालूमपणे भेसळ
मग येईल कसे अंगात बळ?
सारे असे माणसाच्याच कर्माचे फळ
सण, समारंभाच्या नावाखाली
उच्छाद मांडला कर्ण कर्कश अशा डीजेचा
अन् हरवून गेला सूर तो नाद मधुरतेचा
उतमात केला माणसाने निसर्गाच्या दानाचा
घेतला करुनी घात  स्वतःच स्वतःचा
दुष्काळ, पूर, चक्रीवादळ, भूकंप,
अग्निकांड, करोना एकामागुनी एक
केले आघात मग सृष्टीने
समतोल बिघडवण्या निसर्गाचा
मानवच असे कारण हे त्याने जाणले
करता सृष्टीची जपणूक
सुखी होईल जीवन आपसूक
हे मानवाला आता उमगू लागले
अन् त्या दिशेने पाऊल ते मानवाने उचलले....

सौ. राजश्री सुहास जाधव.


9 comments:

  1. अप्रतिम सुंदर लिखाण

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  3. सृष्टीच्या होणाऱ्या हानी बद्दल खूप सुंदर अशी कविता लिहिली आहे प्रत्येकाला विचार करायला लावणारी...अप्रतिम शब्द रचना...👌👍✍️✍️✍️🍫🍫🍫

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर लिहीले आहे 👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete
  5. WOW...!!
    खूप छान अप्रतिमच..👌
    खूप खूप शुभेच्छा 🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  6. वाहा अतिशय सुंदर रचना केलीत...
    💐💐💐💐💐प्रेम कवी🙏🙏🙏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...