आधुनिकतेच्या नावाखाली
अवडंबर माजवले मानवाने
हिरव्या कांतीने नटलेल्या वसुंधरेला
वृक्षतोड करूनी नेस्तनाभूत केले त्याने
सिमेंटची उभारूनी जंगले वेगाने
दुष्काळाला जणू आमंत्रणच दिले मानवाने
शेतात राबणाऱ्या हातांनी वाट शहराची धरली
अन् स्वतःच्या शिवाराला विकण्याची
वेळ माणसावर ती आली
करू लागले दुकानदारही आता
धान्यात बेमालूमपणे भेसळ
मग येईल कसे अंगात बळ?
सारे असे माणसाच्याच कर्माचे फळ
सण, समारंभाच्या नावाखाली
उच्छाद मांडला कर्ण कर्कश अशा डीजेचा
अन् हरवून गेला सूर तो नाद मधुरतेचा
उतमात केला माणसाने निसर्गाच्या दानाचा
घेतला करुनी घात स्वतःच स्वतःचा
दुष्काळ, पूर, चक्रीवादळ, भूकंप,
अग्निकांड, करोना एकामागुनी एक
केले आघात मग सृष्टीने
समतोल बिघडवण्या निसर्गाचा
मानवच असे कारण हे त्याने जाणले
करता सृष्टीची जपणूक
सुखी होईल जीवन आपसूक
हे मानवाला आता उमगू लागले
अन् त्या दिशेने पाऊल ते मानवाने उचलले....
सौ. राजश्री सुहास जाधव.

अप्रतिम सुंदर लिखाण
ReplyDeleteखूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteसृष्टीच्या होणाऱ्या हानी बद्दल खूप सुंदर अशी कविता लिहिली आहे प्रत्येकाला विचार करायला लावणारी...अप्रतिम शब्द रचना...👌👍✍️✍️✍️🍫🍫🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी🙏
ReplyDeleteअगदी बरोबर लिहीले आहे 👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼
धन्यवाद सर 🙏
DeleteWOW...!!
ReplyDeleteखूप छान अप्रतिमच..👌
खूप खूप शुभेच्छा 🌹
आबा 🙏
वाहा अतिशय सुंदर रचना केलीत...
ReplyDelete💐💐💐💐💐प्रेम कवी🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏
Delete