Wednesday, 22 September 2021

ते माझे कधीच नव्हते....




ते माझे कधीच नव्हते.....

माझे हसणे,  माझे रडणे, माझे दिसणे
माझे नाव, माझे गाव आणि माझी माणसे
या माझ्यातच मी गुंतले होते

हृदयाच्या खोल कुपीत खूप काही दडवले होते
ते माझे कधीच नव्हते, हे मी जाणले होते
जे जे होते माझे, ते तर निसर्गाचे दान होते !

लख्ख केले आता मी मनाचे आरसे
जगण्यास बळ देण्या हे आहे पुरेसे

गळून पडले आता मीपणाचे बुरखे
दुःखाला मी केले पारखे

हृदयाच्या खोल कुपीत खूप काही दडवले होते
ते माझे कधीच नव्हते, हे मी जाणले होते......

सौ. राजश्री सुहास जाधव.


7 comments:

  1. क्या बात है..!
    राजश्री जीऽ ..!
    अप्रतिम सुंदर रचना केली आहे..👌
    आबा 🙏

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना mam..खूप मस्त लिहिले..🌺👌👌👌🌿🌿

    ReplyDelete
  3. खूपच भावनिक शब्द आहे खूपच विरहित भावना मांडल्या आहेत

    ReplyDelete
  4. व्वा ताई खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. अप्रतिम सुंदर लिखाण मॅम

    ReplyDelete
  6. क्या बात है...खूप सुंदर रचना राजश्री....🍫👌👍✍️🌹

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...