ते माझे कधीच नव्हते.....
माझे हसणे, माझे रडणे, माझे दिसणे
माझे नाव, माझे गाव आणि माझी माणसे
या माझ्यातच मी गुंतले होते
हृदयाच्या खोल कुपीत खूप काही दडवले होते
ते माझे कधीच नव्हते, हे मी जाणले होते
जे जे होते माझे, ते तर निसर्गाचे दान होते !
लख्ख केले आता मी मनाचे आरसे
जगण्यास बळ देण्या हे आहे पुरेसे
गळून पडले आता मीपणाचे बुरखे
दुःखाला मी केले पारखे
हृदयाच्या खोल कुपीत खूप काही दडवले होते
ते माझे कधीच नव्हते, हे मी जाणले होते......
सौ. राजश्री सुहास जाधव.

क्या बात है..!
ReplyDeleteराजश्री जीऽ ..!
अप्रतिम सुंदर रचना केली आहे..👌
आबा 🙏
अप्रतिम रचना mam..खूप मस्त लिहिले..🌺👌👌👌🌿🌿
ReplyDeleteखूपच भावनिक शब्द आहे खूपच विरहित भावना मांडल्या आहेत
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteव्वा ताई खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर लिखाण मॅम
ReplyDeleteक्या बात है...खूप सुंदर रचना राजश्री....🍫👌👍✍️🌹
ReplyDelete