आई 🌹
वंचित राहिले सदा आईच्या प्रेमाविना
लाभले नाही भाग्य कुशीत तिच्या निजण्या
व्याकुळ राहिलं मन कायम प्रेमासाठी भुकेलं
सांग ना रे देवा काय माझं चुकलं?
कोड कौतुक करून घेण्या
कोणाकडे करू आता मी विनवण्या
होताना मोठी मी तू न कधी पाहिलं
सांग ना रे देवा काय माझं चुकलं?
सगे-सोयरे होते सारे
पण आईविना मज न आवडे दुसरे
स्वप्नात कायम तुलाच गं मी पाहिलं
सांग ना रे देवा काय माझं चुकलं?
एकदा तरी वात्सल्य मातेचे मिळू दे
हेची मागणे आता तुझ्याकडे 🙏
सौ.राजश्री सुहास जाधव.

खुप छान अप्रतिम कविता,पण कोडच्या ठिकाणी गोड पाहिजे👌🍁👍😊🙏
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏 करते तिथे दुरुस्त, पण मला वाटले आपण म्हणताना कोड - कौतुक असे म्हणतो ना? चुकले असेल माझे.खूप मनापासून आभार सर
ReplyDeleteसुंदर कविता लिहिली मॅडम!👌👌👌
ReplyDelete