Monday, 20 September 2021

रंग हा वेगळा....


श्री छत्रपती शिवरायांची

शौर्य गाथा ज्ञात आहे सकळा

रंग तयांचा वेगळा ||

विठ्ठल नाम जपता जपता तुकोबांनी
फुलवला भक्तीचा मळा 
रंग तयांचा वेगळा ||

मातृत्वाच्या दानाचा
नारी अनुभवे सुखसोहळा
रंग तयांचा वेगळा ||

कन्हैयाच्या बासरीने
मंत्रमुग्ध झाल्या गोपिका या गोकुळा
रंग तयांचा वेगळा ||

स्वातंत्र्य प्राप्तीकरिता शूरवीरांनी
जोपासला छंद बलिदानाचा हा आगळा
रंग तयांचा वेगळा ||

क्षितिजा पलीकडले ज्ञात होण्या
मानव झेपावला अंतराळा
रंग तयांचा वेगळा ||

जन्म घेऊनी या भूमीवर
अनुभवते मी नित्य सोहळा
रंग माझा वेगळा || 🌷🌷

सौ.राजश्री सुहास जाधव.


1 comment:

  1. अतिशय सुंदर व सुरेख....
    👌👌👌💐💐💐💐
    प्रेम कवी...✍️

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...