रात्र सरली, सरली वर्ष, सरत चालले आयुष्य
तगमग होई जीवाची, धुंद झाली मती,
फिरुनी जाग्या झाल्या स्मृती,
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मी, झुलते मी |
स्मृतींना गंध आहे शाळेतील मातीशी एकरूप झालेल्या
इवल्याशा निलगिरीचा,
स्मृतींना गंध आहे बासरीतून उमटणाऱ्या
त्या मंजुळ सुरांचा,
स्मृतींना गंध आहे भाबड्या त्या मैत्रीचा,
स्मृतींना गंध आहे हसत खेळत शिक्षण देणाऱ्या
त्या गुरुजनांचा,
स्मृतींना गंध आहे 'सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार
या अभिवादना ' या प्रार्थनेचा,
रात्र सरली, सरली वर्ष , सरत चालले आयुष्य
तगमग होई जीवाची, धुंद झाली मती,
फिरूनी जाग्या झाल्या स्मृती,
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मी, झुलते मी ||
सौ. राजश्री सुहास जाधव.
Friday, 17 September 2021
स्मृती
Subscribe to:
Post Comments (Atom)
बोनस
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
-
ते एक अतिशय सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुटुंब होतं. आई, वडील,दोघी बहिणी, दोघे भाऊ आणि आजी असे. अगदी अलीकडच्या काळातीलच गोष्ट आहे ह...
-
मैफिल पुन्हा शाळेत मुलांची भरेल का? पालवी त्यांच्या मनात शिक्षणाची फुलेल का? वर्ग सारे शाळेतील मुलांच्या सहवासाने हसतील का? नसले जरी तिथे...
-
वृत्त :- व्योमगंगा लगावली :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा मात्रा : २८ धुंदलेल्या या मनाला ... लागलेली आस आहे गुंतले प्रेमात आता ... ...

खूपच सुंदर स्मृती👌👌👌
ReplyDeleteThanks Vrushali Madam 🙏
Deleteआठवणींचा हिंदोळा मस्तच वाह 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteThanks Ranju tai🙏
ReplyDeleteखुप सुंदर रचना केली मॅम 👌👌👌👌🍁
ReplyDeleteखूप मस्त रचना अप्रतिम mam
ReplyDeleteधन्यवाद सूरज🙏
Delete