Thursday, 30 September 2021

मायेची माणसं ....



मायेची माणसं एकामागून एक गेली मज सोडूनी
पारखी झाले मी त्यांच्या प्रेमातुनी
लाड माझे पुरविण्या न उरले आता कुणी
साद माझी जाईल का त्यांच्या कानी ?
तीच माता, तीच भगिनी
अन् तोच भ्राता लाभेल का मजला ?
अर्जव करते रे भगवंता तुजला
गेले सोडूनी जरी ते मला
कप्पा आठवणींचा हृदयात
खोल तो साठवला
येताच आठवणी त्यांच्या
कप्पा तो मी उलगडला 
आठवणी त्या देती पाठबळ
माझ्या जगण्याला....

सौ. राजश्री सुहास जाधव.


6 comments:

  1. हृदयस्पर्शी काव्यरचना केली सखी ✍️🌟👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर 👌👌

    ReplyDelete
  3. खूप सुरेख अप्रतिम☺️🙏

    ReplyDelete
  4. खूपखूप सुरेख रचना..छान लिहलंय

    ReplyDelete
  5. खुप छान , हृदयस्पर्शी ,
    हि कविता वाचून एक असच सुंदर गाणं आठवल
    जिंदगी के सफर मे गुजर जाते हे जो मकाम वो फिर नही आते, वो फिर नाहि आते......

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...