Tuesday, 26 October 2021

राजे आम्ही....



कष्टाला घाबरणाऱ्यातले नाही आम्ही
करून मेहनत, मातीतून सोने पिकवतो नेहमी
वाहते वारे सदैव चैतन्याचे अन् स्फुर्तीचे
जी कवाडे खोलती प्रकाशाचे
का मग भय बाळगावे अंधाराचे ?
अंधारालाही चिरून
खेचून आणू मार्ग ते यशाचे
भिनले नसानसांत संस्कार
शिवबाचे , संतांचे अन् महंतांचे
झोंबतील जरी वारे अपयशाचे
शोधू मार्ग बाहेर पडण्याचे
आहोत राजे आम्ही
आमुच्या मनाचे ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


4 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...