माणूस जन्मास आल्यानंतर तो सुरुवातीस परावलंबी असतो. बाल्यावस्थेत त्याचे खूप लाड होतात,त्याला काय हवे , नको ते पाहिले जाते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात.
पुढे हेच बालक जसे जसे मोठे होते तसे त्याच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावर संस्कार घडतात. त्याला आवश्यक ते ज्ञान प्राप्त होते . पुढे समाजात वावरताना त्याचा शैक्षणिक, बौद्धिक, आर्थिक , मानसिक
विकास झालेला असतो. आणि जीवनात हवे ते त्याने
साध्यही केलेले असते. पण तरीही माणूस पूर्णपणे संतुष्ट असतो का?
ह्याचे उत्तर नाही हेच येणार , कारण मानसिक रित्या माणूस पूर्णपणे सक्षम झालेला नसतो. आपण
सारेच भौतिक सुखाच्या मागे धावत असतो. तेच खरे सुख
आहे, असे मानण्यात धन्य होत असतो . अशावेळी आपल्याला राग, लोभ, हेवेदावे ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो, आणि आत्म आनंदाला आपण पारखे होतो.
बाह्यतः सुख शोधताना , आपण आयुष्याचं गणित
आणखी अवघड करून ठेवतो. खरे सुख हे आपल्या अंतरी दडलेले आहे, हे कधी आपण ध्यानात घेत नाही.
ज्यावेळेस आपल्याला हे कळून चुकेल की, देह, इच्छा, आकांक्षा, मत्सर ह्या बाह्य दिसणाऱ्या गोष्टी , कालांतराने नष्ट होणाऱ्या आहेत. आत्मा हाच निरंतर आहे, सत्य आहे. आत्मसुख हेच श्रेष्ठ आहे. तेव्हाच माणूस स्वतःचा शोध घेण्यास यशस्वी होऊ शकतो.
ऐहिक सुखा मागे न धावता माणसाने अहंभाव सोडला तर आयुष्याचे गणित सोडवण्यास त्याला कसलीच अडचण येणार नाही.
सौ. राजश्री सुहास जाधव.
अगदी बरोबर सांगितलं माणूस भौतिक सुखमागे धावतो आणि खरं आनंद विसरतो खूप छान लिहिलंय
ReplyDeleteअगदी योग्य लिहीलत आपण... वास्तवदर्शी, अप्रतीम लेख...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर व सुरेख वास्तविक रचना...
ReplyDeleteखरंय मॅडम...माणूस जेव्हा स्वार्थी होतो.तेव्हा त्याला इतरांचे सुख,आनंद पाहवत नाही.त्यामुळे तो आत्मानंदच विसरतो.चिंतनात्मक लेख!✍️��������
ReplyDeleteअगदी वास्तव मांडले सखी अप्रतिम लेखन ✍️👌
ReplyDeleteखूप मस्त लेख अप्रतिम वास्तव मांडले..🌿🌹🌺🌺👌👌👌👌
ReplyDelete