स्वप्नात एकदा मी जात होते अनोळखी वाटेने
सोबत नसे कोणीही चालत होते धीराने
निःशब्द होते सारे, भयभीत होत होते
माझ्याच पावलांच्या नादाने
कूस बदलली अचानक
त्या दिशाहिन वाऱ्याने
स्पर्शुनी गेली मजला
झुळूक ती अलवारपणे
मोहरूनी गेले सारे अंग
शीतल त्या वाऱ्याने
वाट पुढे ती चालता
मंजुळ स्वर ते कोकिळेचे,
अन् पक्ष्यांचे ते किलबिलने,
भ्रमरांचे ते गुंजारवने,
अन् मैनेचे ते गुणगुणने,
ऐकुनी मंत्रमुग्ध जाहले
अनुपम चित्र ते निसर्गाचे
मी माझ्या नेत्रांनी अनुभवले
मग होऊनी पाखरू
विहरत राहिले मी आकाशी
नसे तमा मग कशाची
इतुक्यात हाक ऐकू आली आईची
अन् दचकुनी जागी होऊनी
माघारी फिरले त्याच वाटेने
वाट पाहत स्वप्नांची नव्याने
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे शेवटची ओळ खुपच सुंदर लिहिली आहे
ReplyDeleteखूप मस्त रचना अप्रतिम सुंदर
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteअप्रतिम शब्दगुंफन केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय
ReplyDeleteखुप छान🤘👌
ReplyDelete