Tuesday, 5 October 2021

अपयश ही यशाची शिडी




प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात यश-अपयश हे येतच असते. ह्या ऊन-सावलीच्या खेळातूनच माणूस हा घडत असतो.
       अपयश हे कुठल्याही प्रकारचे असू शकते. कधी कधी माणसाला नोकरीत अपयश येते. माणूस एका जागी नोकरीत स्थैर्य प्राप्त करू शकत नाही, त्यामुळे तो निराश होतो, त्याचा आत्मविश्वास ढासळतो. कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात, किंवा एखादा मुलगा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे अशा स्पर्धात्मक युगात मागे पडल्याने त्याचे मनोधैर्य खचू लागते. तसेच आताचा सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे ' बेरोजगारी '. वाढत्या बेरोजगारीने तरुण पिढी नैराश्यात जाते. सतत होणाऱ्या लोकांच्या टीकेमुळे माणसाला अपयश पचवणे जड जाते आणि माणूस नैराश्यातून नको ते करून बसतो.
         ह्या येणाऱ्या अपयशाकडे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यातील असलेल्या त्रुटी कमी करण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. अपयशाच्या अनुभवातून शहाणपण घेऊन जिद्दीने पुन्हा जोमाने कष्ट करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. कोणत्याही कामाची लाज न
बाळगता कठोर परिश्रम माणसाने घेतले पाहिजे. तरच अपयशाकडून यशाकडे जाण्याची वाटचाल सुकर होऊ शकते. माणूस अपयशाच्या खोल दरीतून तावून सुलाखून बाहेर येऊ शकतो.
        यश मिळवण्यासाठी माणसाने धीर, संयम बाळगला पाहिजे. आजच्या या नव्या युगात प्रत्येकालाच यश हवे असते पण त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी माणसाची नसते. माणसाला झटपट यश हवे असते. कमी श्रमात जास्त फायदा माणसाला हवा असतो. मग त्याकरिता तो चुकीच्या मार्गाचाही अवलंब करतो. अशा मार्गाने मिळणारे यश हे अल्पकाळ टिकणारे, मनात असंतोष निर्माण करणारे असेच असते.
        मिळणाऱ्या यशाने हुरळूनही जाऊ नये. आपले पाय घट्ट जमिनीवर रोवलेले पाहिजे. यशाची एक एक पायरी वर चढताना स्वतःचा मानसन्मान, नैतिकता न सोडता आत्मविश्वासाने यशाचे शिखर गाठले पाहिजे. जीवनात या आपल्याला, पडू दे उजेड यशाचा.
उ - उठा
जे - जेते व्हा.
ड - डगमगू नका.

सौ.राजश्री सुहास जाधव.


8 comments:

  1. अतिशय सुंदर msg ...खूप खूप सुंदर लिहिलंय👌👌👌

    ReplyDelete
  2. अपयशातून यशा कडे कसे जावे हे छान रितीने समजावलेस 👌👌

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे उत्स्फूर्त

    ReplyDelete
  4. सुंदर शब्दांत अप्रतिम सकारात्मक संदेश!✍️👌👌👌

    ReplyDelete
  5. सुंदर संदेश दिला 👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...