डोंगर दऱ्या, झुळ झुळणारे झरे
हिरव्या कांतीने नटलेली वसुंधरा
सप्तरंगांची उधळण करणारे नजारे
सारी पंचतत्त्वे, सारेच आहे निसर्गाचे दान
न करावा कधीच त्याचा अवमान
लाभले आपुल्यास हे वरदान
ठेवावी साऱ्यांनी त्याची जाण
खरेच राखतो का मानव त्याचे भान ?
फायद्यासाठी स्वतःच्या
ओरबाडून घेतला सृष्टीचाच प्राण
माजवले प्रदूषण हरतऱ्हेने
घालविली साऱ्या निसर्गाची शान
अन् बिघडवले स्वतःचेच जीवनमान
निसर्गाच्या दानाचा करिता अवमान
होईल जीवन नर्कासमान
म्हणून मानवा, जतन करून
ठेवावे निसर्गाच्या दानाला
होईल अर्थ प्राप्त
आपुल्या जगण्याला....
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप छान �������� निसर्गाचा हा मुक्त ठेवा जाणीवपूर्वक सांभाळून ठेवू ...... निसर्गाचे विविध रंग डोळ्यात मनापासून साठवून ठेवू .....��������
ReplyDeleteनिसर्ग एक महान गुरु...दातृत्व शिकण्यासारखेच! सुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteछान निसर्ग रचना 👌👌
ReplyDelete