Wednesday, 6 October 2021

बकुळी



चांदण्यासम भासते नाजूक ती बकुळी

रंगाने असली जरी सावळी

परी सुवासिक सुगंधाने ती दरवळली

सुकूनही सुगंध देण्यास अवतरली भूवरी

संध्यासमयी पखरण होता फुलांची

भासते जणू अंगणी अवतरली नक्षीही नक्षत्रांची

अलवार ओंजळीत घेऊनी

सुगंध तो साठविता मनी

जातो घेऊनी रम्य त्या बालपणी

स्मरती अजूनही बकुळ फुलांवरील गाणी

स्वप्नी दिसे मग वेचिता फुले ती नाजूक सावळी

अर्पिते मी तया श्रीहरी चरणी सकळी

कृष्ण- राधेच्या प्रेमात रंगली ही बकुळी....

सौ. राजश्री सुहास जाधव.


7 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...