Wednesday, 13 October 2021

आठवणी



हृदयीच्या खोल कोंदणात दडलेल्या असती आठवणी

सोबत नसली जरी, तरी निरंतर राहतात आठवणी

मनपटलातील आठवणींसवे रमते मी, रमते मी....

एकांती कातरवेळी मन जाते सैरभैर होऊनी

मग मोरपिसासम हळुवार स्पर्शूनी

जातात मनास आठवणी

मनपटलातील आठवणींसवे रमते मी, रमते मी...

गोड, कटू, सुखदायक, दुःखदायक, अन्

असह्य असती त्या आठवणी

मनपटलातील आठवणींसवे रमते मी, रमते मी...

आठवे मज बालपणीच्या गमतीजमती,

अन् आठवे मज शाळेतील भाबडी मैत्री ती

आठवे मज शाळेत भोगलेली शिक्षा ती

अन् आठवे मज पाठीवर मिळालेली

शाबासकीची थाप ती

आठवे मज पहिल्या प्रेमाची साद ती

अन् आठवे मायेची  हाक ती

जिवाभावाचे सोडूनी गेले जरी

नित्य राहती स्मरणात परी

असह्य होई जेव्हा आठवणी

मग करते तयांची पाठवणी

मनपटलातील आठवणींसवे रमते मी, रमते मी...

सौ. राजश्री सुहास जाधव.


8 comments:

  1. खुप सुंदर लिहिलंयस 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना...

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना👌👌👌

    ReplyDelete
  5. आठवणींचा सुंदर धांडोळा घेतला आहे👌👍

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर च 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...